माजलगावचा बॉडीबिल्डर देशात चमकला !

Spread the love
  • हाफेज माजेद बागवानने पंजाबमध्ये झालेल्या नॅशनल बॉडीबिल्डींग स्पर्धेत यश

 

माजलगाव: आपल्या माजलगाव शहरातील रहिवाशी सर्वसामान्य कुटुंबातील हाफेज माजेद बागवान ह्यांनी पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देशातून पाचवा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. बिल्डर हाफेज माजेदच्या रूपाने माजलगावचे नाव देशात चमकले आहे. माजेदचे फटाक्याच्या आतषबाजीत शहरात बोडीबिल्डींग प्रेमींनी जंगी स्वागत केले.

देशपातळीवरील लुधियाना येथे IBBF MR India सिनियर नेशनल्स बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे दि.२३, २४ व २५ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ६५ किलो वजन गटातून हाफेज माजेद बागवान याने राज्याचे नेतृत्व करताना आपल्या पिळदार शरीरशृष्टीचे प्रदर्शन करत पाचवा क्रमांक पटकावला. प्रथमच देश पातळीवरील स्पर्धेत आपल्या शहरातील तरुणाने आपली चमक दाखवून दिली आहे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत लुधियाना येथून माजलगाव शहरात येताच बोडीबिल्डिंग प्रेमिसह नागरिकांनी त्याचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले.

बॉडीबिल्डिंग स्पर्धेत हाफेज माजेद बागवान ने यश मिळवल्याबद्दल सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करतांना प्राचार्य सानप सर व इतर.

बागवान हे सामान्य कुटुंबातील !

बोडीबिल्डर हाफेज माजेद बागवान हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. दैनदीन आपला पारपरिक फळ विक्रीचा व्यवसाय दिवसभर करतात. त्यातून पहाटे व रात्री शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील स्टार हेल्थ क्लब येथे ट्रेनर म्हणून अनेक नव युवकांना मार्गदर्शन करतात.

Leave a Reply