शेतकऱ्यांना मिळणार मिस्ड कॉलवर कर्ज !

Spread the love

– या बँकेची योजना

केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्ज, अनुदानापासून वेगवेगळ्या यंत्रांसाठी सर्वतोपरी आर्थिक करण्याचे धोरण राबवत आहे. बँकांनीही आत्ता कृषी कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. त्यातच पंजाब नॅशनल बॅंकेने तर एका मिस्ड कॉलवरच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

अशी आहे कर्ज प्रक्रिया …
शेतकरी अतिशय सहज आणि माफक अटींवर अर्ज करून ‘पीएनबी’चे कृषी कर्ज मिळवू शकणार आहेत. केवळ शेतकऱ्यांना त्यासाठी मेसेजमध्ये फक्त Loan असं लिहून 56070 या नंबरवर पाठवावा. किंवा 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन कर्ज मिळू शकते. तसेच शेतकरी नेटबँकिंगद्वारेही कृषी कर्जासाठी अर्ज ही शकतात. त्याकरिता ‘पीएनबी’च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी कर्जासाठी अर्ज करावा लागेल. याबाबत अधिकृत ट्विटर हॅंडलवर पीएनबी बँकेने याबाबतची माहिती दिली आहे.

Leave a Reply