माजलगावात डॉक्टरची झाली फसवणूक, ७५ हजाराचा बसला फटका !

Spread the love

माजलगाव, दि.२८: शहरातील एका डॉक्टरला फ्लिपकार्टवरून मागवलेले पार्सल परत करण्यासाठी फ्लिपकार्ट कस्टमर केवरला फोन लावला असता, त्यावरील अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले व त्यातून पार्सल परत करता आले नाही. मात्र डॉक्टरच्या खात्यातील ७५ हजार रुपये पळवले गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील समता कॉलनी येथील डॉ.शामसुंदर दगडूराम काकाणी फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला असता त्यांना इंडिया कस्टमर केयर अस उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख होता. त्या नंबरवर त्यांनी क्लिक केले असता एक नंबर स्क्रिनवर दिसला. डॉ. काकाणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला. अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार डॉ. काकाणी यांनी ते ॲप डाऊनलोड केले अन इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही. परंतू डॉ. काकाणी यांच्या खात्यावरील ७५ हजार रुपये मात्र सायबर भामट्याने पळवले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.

Leave a Reply