वेड्याला शहाणपण सुचलं, मात्र माजलगाव पालिकेला सुचेना !

Spread the love

माजलगाव, दि.२८: शहरात मोकाट जनावरे मरून पडल्यावर त्याची विल्हेवाट लावण्याची नगर पालिकेची जवाबदारी आहे. मात्र पालिकेला शहाणंपण सुचेना गेले, पण वेड्याला शहाणपण सुचलं अन् त्याने दोन दिवसापासून मरून पडलेलं कुत्र्यांची दुर्गंधी येत असल्याने त्याला गावाच्या बाहेर नेऊन टाकले.

माजलगाव शहरात मोकाट जनावरांचा त्रासाने शहरवासीय त्रस्त आहेत. त्यातच ही मोकाट जनावरे मरून पडल्यास कित्येक दिवस एकाच जागेवर पडून राहतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते अन् नागरिकांना दुर्गंधीचा सामना निमूटपणे करावा लागतो. यावर नगर परिषदला आपले कर्तव्याची जाणिव होऊन शहाणपण सुचत नाही. असाच प्रकार बुधवारी सकाळी १ वा. दरम्यान तहसिल कार्यालय परिसरात मरून पडलेल्या कुत्र्यांची दुर्गंधी पसरली होती. यावर जो तो नाकाला हात लाऊन मार्ग काढत होता. यांची जाणीव पालिकेच्या व्यवस्थेला होऊन शहाणपण सुचलं नाही, मात्र एका वेड्याने हा नागरिकांना होणारा त्रास पाहून त्या मेलेल्या बेवारस कुत्र्याला उचलून गावाच्या बाहेर नेऊन टाकले. यामुळे नागरिक मोठ्या कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते.

Leave a Reply