अखेर डॉ.शरद पवारसह नर्स वर गुन्हा दाखल

Spread the love
  • दिड महिन्याच्या बाळाला मुदत संपलेला पाजला होता डोस !

माजलगाव, दि.२७: शहरातील पवार हॉस्पिटल येथे दिड महिन्याच्या बाळाला मुदत संपलेला डोस पाजला होता. याप्रकरणी अखेर अन्न व औषध प्रशासनाने डॉ.शरद मधुकर पवार व एका नर्स वर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पवार हॉस्पिटल येथे शितल आनंद राऊत यांच्या दिड महिन्याच्या बाळाला डोस पाजण्यात आला होता. हा डोस बाळाची आई शितल हिने पहितला असता तो मुदत संपलेला आदळून आला. यावर बाळाचे आजोबा अशोक धारक यांनी आरोग्य विभागाकडे पवार हॉस्पिटलचे डॉ.शरद पवार यांची तक्रार केली. यावर अन्न व औषध प्रशासनाने चौकशी केली. या चौकशीत हॉस्पिटलमध्ये नोंदवही ठेवलेली नव्हती, तसेच लशिबाबत रेकॉर्ड आलेले नव्हते. यासह अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास दिरगाई होत होती. बाळाचे नातेवाईक अशोक धारक यांनी मात्र पाठपुरावा कायम ठेवला. अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून औषधी निरीक्षक विलास दुसाने यांच्या फिर्यादीवरून डॉ.शरद मधुकर पवार व नर्स सोनाली चंद्रसेन गोरे यांच्या विरुद्ध सोमवारी रात्री ९.४३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार माधव हौसाजी तोटेवाड हे करत आहे.

Leave a Reply