हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानात सहभाग व्हा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन

Spread the love

एक दिवसात करणार ३० लाख वृक्षारोपण

बीड :- हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत हरित जिल्हाभरात प्रभावी राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि.७ ऑगस्ट रोजी खंडेश्वरी मैदान, बीड येथे होणार आहे. या अभियानात जिल्हाभरात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात उत्सफूर्त सहभाग नोंदवावा. एकाच दिवशी जिल्हाभरात ३० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प असून वर्षभरात एक कोटी वृक्षांची लागवड. या अभियान अंतर्गत वन विभाग दहा लाख, सामाजिक वनीकरण पाच लाख, जिल्हा परिषद पाच लाख, तुती लागवड तीन लाख, कृषी दोन लाख, नगर पालिका दीड लाख, वन्यजीव ७५ हजार, पोलिस ५० हजार, इको बटालियन ५० हजार व इतर यंत्रणा, स्वयंसेवी संस्था एक लाख ७५ हजार रोपांची असे एकूण ३० लाख रोपे लावणार. यामधेव स्थानिक प्रजातीचे वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, सिसू, करंज, शेवगा, जास्वंद आदी प्रकारच्या रोपांचा समावेश
क्यू आर कोड, जिओ टॅगिंग, वन विभागाकडून ड्रोनच्या साहाय्याने छायाचित्रण होणार असून १२ हजारांहून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ यात सहभाग घेणार आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी वृक्ष लागवड करून अभियान प्रभावी राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Leave a Reply