गोदावरी नदीचा पूर का ठरणार … महापूर ?

Spread the love

जायकवाडी धरणाच्या निर्मिती नंतर आत्तापर्यंत केव्हाच ३ लाख क्युसेक्स वर पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेले नाही. यापूर्वी जास्तीत जास्त २ लाख ६१ हजार क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात झालेला आहे. त्यामुळे २००६ पेक्षा अधिक नुकसानकारक महापूर ठरण्याची शक्यता आहे.

पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, गेवराई, माजलगाव, पाथरी, परळी, या तालुक्यातून खाली नांदेड ला जाणाऱ्या गोदावरीला प्रचंड महापूर जबर नुकसान पोहचवणार आहे. इतिहासात कधीच जायकवाडी प्रकल्पाचा ३ लाखाच्या पुढून विसर्ग सोडण्यात आलं नव्हता. यावेळी तो तब्बल साडे तीन लाखा पर्यंत जाईल असे सध्या जायकवाडी धरण कार्यक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे सांगण्यात येत आहे. रात्री ११.३० पर्यंत जायकवाडीतून ३ लाख ६ हजार ४० तर माजलगाव धरणातून ५८८३६ इतका विसर्ग सुरु आहे. त्यामुळे माजलगावचा सिंदफना काठ देखील बाधित होणार आहे. प्रत्येकाने आता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागणार असून कुठलीही जोखीम नागरिकांनी पत्करू नया. शेतकऱ्यांनी त्यांचे पशुधन (जनावरे) सुरक्षित स्थळी हलवा. यापूर्वी जास्तीत जास्त 2 लाख 62 हजार क्यूसेक चा विसर्ग जायकवाडीतून करण्यात आलं होता. पण यावेळी जायकवाडी आणि माजलगाव चा विसर्ग 4 लाखाच्या आसपास असेल.

Leave a Reply