छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हे’ 12 किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये

Spread the love

युनेस्कोची घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

झटपट बातमी –

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी भारत सरकारकडून देशवासीयांचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील 12 किल्ल्यांचं नामांकन पाठवण्यात आले होते. या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून केली आहे.

फडणवीस म्हणाले, मला हे सांगताना आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी असे ११ तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे,” असं फडणवीस यांनी नमूद केलं.

अद्वितीय वैश्विक मूल्य …

स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.

Leave a Reply