महाराष्ट्रात पहिल्यांदाच माजलगावकरांना तिरुपती देवस्थानची अनुभूती – बाळू ताकट
माजलगाव, दि.17 : शिवसेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त आयोजित श्रीमद् भागवत कथेसह किर्तन महोत्सवाची सांगता उत्साहात पार पडली. आज सोमवार दि.17 रोजी तिरुपती बालाजी देवस्थान येथील श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणारा हा उत्सव महाराष्ट्रात प्रथमच माजलगावकरांना श्रीदेवी व भुदेवी भगवान स्वामी व्यंकटेश्वर सोबत दिव्य लग्नाची अनुभुती लाभणार असून यामध्ये भाविकांनी मोठ्या शाखेने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक बाळू ताकट यांनी केले आहे.

माजलगावकरांना शिवजन्मोत्सव समिती माजलगाव च्या वतीने यावर्षी अनेक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यामध्ये नुकतेच दि.८ ते दि.१४ दरम्यान श्रीमद् भागवत कथा, दि.१४ ते दि.१६ या तीन दिवस कीर्तन महोत्सव हे कार्यक्रम पार पडले. तसेच आत्ता आज पासून तिरुपती बालाजी देवस्थान येथे होणारा बालाजी महोत्सवाची अनुभूती प्रथमच महाराष्ट्रात माजलगावकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. याची सुरुवात शहरातील मंगलनाथ मैदान येथे आज दि.१७ सोमवार पासून मंगळवार, बुधवार असे तीन दिवस चालणार आहे. यामध्ये आज सोमवार दि.१७ रोजी स.५ वा. सुप्रभात सेवा, स.६:३० वा. सहस्त्र नामार्चन, स.७:३० वा. प्रभोद सेवा, स. ८:३० वा. अभिषेक, स.११:३० वा. श्रृंगारपुजा, दु.१२ वा.महाभोग व आरती, सायं ६:१५ वा.दिपोत्सव व झुलोत्सव, सायं ७:३५ वा. महाआरती व मंगळवार दि.१८ रोजी स.५ वा. सुप्रभात सेवा,स.६:३० वा. मुल्यमूर्ती बालाजी महाअभिषेक स.९ वा. तोमाला वस्त्र सेवा, स. १०:३० वा.हवन, सायं ५ वा. लक्ष तुलसी अर्चना, रातौ ८ वा. महाआरती तर बुधवार दि.१९ रोजी सकाळी १० वा.कुंकुमार्चन, दुपारी ४ वा. पालखी सोहळा, सायं ६ वा. कल्याणोत्सव श्री बालाजी व पद्मावती देवी विवाह सोहळा अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे सर्वधर्मीय विवाह पार पडणार आहेत, या मध्ये भाविकांनी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक बाळू ताकट यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
*सेवेचा लाभ घ्यावा*
तीन दिवस चालणाऱ्या बालाजी महोत्सव मध्ये अभिषेक, श्रृंगारपूजा, महाआरती, सहस्त्र नामार्चन यासह विविध पुजेमध्ये सहभागी होण्या करिता भाविकांना निःशुल्क सहभाग घेता येणार आहे. तरी सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी जगदीश साखरे मो.9422243891, महेश होके मो. 9890984039, प्रवीण चांडक मो. 7507421842, विनोद लड्डा मो. 9922512222, आंबेकर ऋषी मो. 7887659301 यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
