शोभायात्रेत सहभागी होण्याचे बाळू ताकट यांचे आवाहन.
माजलगाव, दि.७ : माजलगावात शिवजन्मोत्सवा निमित्त आज (शनिवार) दि.८ पासून श्रीमद् भागवत कथेची सुश्री राधास्वरुपा अनन्या दीदी शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता शहरातील हनुमान चौक येथून मंगलनाथ मैदान येथील सभा मंडपापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ताकट यांनी केले.

शिवजन्मोत्सवा निमित्त यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यासह यावेळी श्रीमद् भागवत कथा, तिरुपती बालाजी महोत्सव आदी कार्यक्रम पार पडणार असून सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने आज (दि.८) शनिवार पासून श्रीमद् भागवत कथेची सुरुवात होणार आहे. कथावाचक सुश्री राधास्वरुपा अनन्यादीदी शर्मा यांच्या मधुर वाणीतून दि.८ ते दि.१२ फेब्रुवारी दरम्यान श्रीमद् भागवत कथा पार पडणार आहे.
तत्पूर्वी आज सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, हनुमान चौक येथून मंगलनाथ मैदानावरील कथा स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजन्मोत्सव विवाह सोहळ्याचे आयोजक बाळू ताकट यांनी केले आहे.
