आ.सोळंके समर्थकांकडून पंकजा मुंडेंना पहिला धक्का !

Spread the love

कोण कोण बजरंग सोनवणेच्या तंबूत होणार दाखल ?

झटपट बातमी :-
आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणारे त्यांचे समाजात स्थान असलेले निकटवर्तीय कार्यकर्ते बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या तंबूत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पहिला धक्का हा माजलगाव मधून पंकजा मुंडे यांना बसणार असल्याची चर्चा होत आहे.

बीड लोकसभेची रणधुमाळी जोर धरू लागली आहे. भाजपकडून पंधरा दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानुसार मुंडे यांनी जिल्ह्याचा संपर्क दौरा ही पूर्ण केला. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून काल बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आज (दि.५) आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव आदी भागात संपर्क दौरा सुरू केला. आज दुपारी ५ वाजता माजलगाव येथे त्यांच्या भेटी गाठी होणार असून यात आ.प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक असणारे निकटवर्तीय हे बजरंग सोनवणे यांच्या तंबूत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आ.प्रकाश सोळंके ह्यांनी सर्वप्रथम माजलगाव मधून पंकजा मुंडे यांना मताधिक्य देणार असल्याची वल्गना केली होती. तसेच स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे ऋण फेडणार असल्याची प्रतिपादन करत भावनिक झाले होते. आत्ता त्यांचेच समर्थक कार्यकर्ते हे पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी असणारे बजरंग सोनवणे यांना साथ देणार असल्याने त्यांना म्हणजे पंकजा मुंडे यांना हा सोनवणे यांच्याकडून पहिला धक्का बसणार आहे.

Leave a Reply