माजलगाव, दि.०४: कर्जदार कृष्णा सोनटक्के याने वाहन खरेदीसाठी फिर्यादी संस्था सद्गुरूकृपा ऑटोमोबाईल माजलगाव यांचे कडून पाच लाख रुपये कर्ज घेतले होते सदर कर्जास आरोपी वैभव कुंदनमल कोटेचा हे जमीनदार/सहकर्जदार होता.
सदर वाहन कर्ज थकीत झाल्यामुळे फिर्यादी संस्थेने कर्जाची मागणी कर्जदार व सहकर्जदार आरोपी वैभव कोटेचा यांचे कडे केली असता आरोपी वैभव कोटेचा यांनी त्याचे खाते असलेल्या डी. सी. सी. बँकेचा रुपये १ लाख ५५ हजार ५२० रुपयाचा धनादेश फिर्यादी संस्थेला दिला होता सदर धनादेश फिर्यादी संस्थेने वाटविणेसाठी बँकेत जमा केला असता तो धनादेश न वटता परत आलेने फिर्यादीने आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवली परंतु नोटीस मिळून ही आरोपीने धनादेशावरील रक्कम न दिलेने फिर्यादी संस्था सदगुरुकृपा आटोमोबाईल माजलगाव यांनी माजलगाव येथील न्यायालयात एन. आय. अक्टचे कलम १३८ प्रमाणे आरोपी वैभव कुंदनमल कोटेचा विरुद्ध केस नं.५१०/२०२० ही दाखल केली होती.
या प्रकरणी सुनावणी माजलगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. कुलकर्णी यांचे समोर झाली. सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी हा फिर्यादी संस्थेचा कायदेशीर देणेदार आहे व त्याने सदर वाहन कर्ज परत फेडीसाठीच तो धनादेश फिर्यादीस दिल्याचे पुराव्या अंती सिद्ध झाल्याने मा. न्यायालयाने आज (दि.४) गुरुवारी आरोपी वैभव कुंदनमल कोटेचा रा. नांदूरघाट ता.केज याला एक महिना शिक्षा व रक्कम २ लाख १० हजार ५२० रुपये दंड व दंड न भरल्यास पुन्हा दोन महिने शिक्षा असा आदेश केला आहे. सदर प्रकरणात फिर्यादी संस्थेच्या वतीने ॲड.विवेक शिंदे यांनी काम पहिले व त्यांना ॲड.बालाजी जाधव यांनी सहकार्य केले.