बीड, दि.२०: बीड लोकसभेच्या निवडणूक करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच प्रमुख लढतीत असणारे भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित आघाडी यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. यातच लोकसभा निवडणूक लढण्याबाबत स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे शिवसंग्रामकडून निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. आत्ता या चर्चा बाबत आज (दि.२०) शनिवारी बीड येथील शिवसंग्राम भवन येथे पत्रकार परिषद घेऊन बीड लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
सुरुवातीला भाजपकडून पंकजा मुंडे ह्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यावर स्पर्तिस्पर्धी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार) यांच्या पक्षाकडून ज्योतीताई मेटे व बजरंग सोनवणे यांच्या नावावर चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार) कडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे ज्योतीताई मेटे यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते व जनतेतून होती. मात्र आज दि.२० रोजी ज्योतीताई मेटे ह्यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी शिवसंग्राम चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.