ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी; सरपंच, वरिष्ठ लीपिकासह चार जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

माजलगाव, दि.२२: माजलगाव पंचायत समिती अंतर्गत लोणगाव येथील ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार (वय ३५ वर्षे) यांच्या आत्महत्या प्रकरनी लोनगावचे सरपंच, पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव पंचायत समितीला बदलून आलेले ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार हे तालुक्यातील लोणगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. बुधवार दि.२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माजलगाव शहरालगत असलेल्या भाटवडगाव वसाहत येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी आत्महत्येचे कारण समोर आले नव्हते, मात्र रात्री उशीरा माजलगाव शहर पोलीस ठाण्यात मयत ग्रामसेवक रविंद्र पवार यांचा भाऊ सुनील सर्जेराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोनगावचे सरपंच नारायण राऊत, पंचायत समिती येथील वरिष्ठ लिपिक सिद्दीकी, ग्रामपंचायत ऑपरेटर आगे, आसाराम आलात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वरील आरोपी हे माझे भाऊ ग्रामसेवक रविंद्र पवार यांच्यावर चुकीचे कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच मानसिक त्रास देऊन जीव मारण्याचे धमक्या देत असल्याचे नमुद केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस जमादार राम भंडाणे हे करत आहेत.

Leave a Reply