माजलगावात ग्रामसेवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

माजलगाव, दि.२१: येथील पंचायत समिती अंतर्गत लोणगाव येथील ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार (वय ३५ वर्षे) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

दोन महिन्यापूर्वी कोकण विभागातून माजलगाव पंचायत समितीला बदलून आलेले ग्रामसेवक रवींद्र सर्जेराव पवार हे माजलगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोणगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. आज दि.२१ रोजी माजलगाव पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकाच्या आयोजित केलेली मीटिंग ते उपस्थित होते. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माजलगाव शहरालगत असलेल्या भाटवडगाव वसाहती मध्ये राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू असून आत्महत्येचे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.

Leave a Reply