५१ लाखांच्या रोड रॉबरीचा पोलिसांनी लावला दहा दिवसात छडा !

Spread the love

टोळीतील ६ आरोपी जेरबंद, एक फरार; आरोपी केज, धारुरचे

झटपट बातमी –

बीड : कापुस विकून मिळालेले ५१ लाख रुपये घेऊन जाताना व्यापाऱ्यास वडवणी जवळ अडवत मारहाण करुन लुटल्याची घटना दि .७ फेब्रुवारीला सायं. ६ च्या सुमारास घडली. यावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तपास सुरू केला. या टोळीचा छडा लावून सहा आरोपी जेरबंद केले असून एक फरार आहे. चोरलेले ५१ लाख रोकडसह गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी जप्त केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शामसुंदर आण्णासाहेब लांडे रा. घाटसावळी ( ता. बीड ) हे कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. ७६० क्विंटल खरेदी केलेला कापूस शामसुंदर लांडे यांनी केज येथील माऊली जिनिंग येथे विक्री केला. यातून त्यांना कापूस विक्रीतून मिळालेले ५१ लाख रुपये घेऊन ते दुचाकीवरून धारुर- चिंचवण- वडवणी मार्गे घाटसावळीकडे जात होते. मात्र वडवणीलगत असलेल्या खडी क्रेशर जवळ पाठीमागून एका दुचाकीवरून दोघे तोंड बांधून आले त्यांना दुचाकी आडवी लावत अडवले. त्यातच काही क्षणातच स्विफ्ट कार आली व तिच्यातून तोंड बांधलेले तिघेजण व्यापाऱ्याच्या दुचाकीजवळ आले. या पाच जणांनी लांडे यांना लाकडी दांड्याने मारहाण करुन त्यांच्या जवळील पैशाची गोनी (ज्यात ५१ लाख) घेऊन वडवणीच्या दिशेने लंपास झाले. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात शामसुंदर लांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यावर पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी तात्काळ स्था.गु.शाखा (Beed LCB) पथकास कामाला लावले. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी केज, धारुर, तेलगाव, दिंद्रुड, सिरसाळा,आडस परिसर पिंजून काढला. तपास करत असतानाच हा गुन्हा बालाजी महादेव पुरी मैंद ता. केज याने केल्याची गुप्त माहिती मिळाली. यातील तीन आरोपी आडस रोड परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच बीड एलसीबीने जुना आडस रोड परिसरात सापळा लावून १) शांतीलाल उर्फ गणेश दामोधर मुंडे (वय २१ वर्षे) रा. गोपाळपुर ता.धारुर, २) बालाजी रामेश्वर मैद (वय २० वर्ष) रा.मैदवाडी ता.धारुर, ३) गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेहरकर (वय ३३ वर्षे) रा.बाराभाई गल्ली, केज यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सदर लुटीचा गुन्हा हा माऊली जिनींग मधील मार्केट कमिटीचा कामगार ४) सुर्यकांत लक्ष्मण जाधव रा. केज याचे मदतीने ५) करण विलास हजारे (वय २० वर्षे) रा.केज, ६) बालाजी रामेश्वर मैंद (वय २० वर्षे) रा.गोपाळपुरा, ७) संदिप वायबसे (फरार) यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.
यातील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे. सदरील कामगिरी नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, माजलगाव सहा.पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि संजय तुपे, पोउपनि सुशांत सुतळे, पो.ह.कैलास ठोंबरे, नसिर शेख, अशोक दुबाले, भागवत शेलार, पो.ह. रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, पो.शि.बप्पा घोडके, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, पो.ह. रविंद्र गोले, देविदास जमदाडे, गणेश हांगे, चालक अतुल हराळे, गणेश मराडे यांनी केली.

Leave a Reply