मनोज जरांगे पाटील यांना सर्वस्तरातून पाठिंबा
माजलगाव, दि.१७: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन होत आहेत. याच आंदोलनास पाठिंबा म्हणून माजलगाव येथे आज (दि.१७) शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले होते.
त्यानुसार आज (शुक्रवारी) माजलगाव शहरातील बाजार समिती कार्यालय समोरील प्रांगणात या धरणे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, बाबुराव पोटभरे, सहाल चाऊस, जयदत्त नरवडे, श्रीहरी मोरे, अरुण राऊत, मनोहर डाके, बबनराव सोळंके, शेख मंजूर, नासेर खा पठाण,नारायण होके, ऍड.बी.आर. डक, नितीन नाईकनवरे, डॉ.अशोक तिडके, कचरूजी खळगे, अच्युतराव लाटे, ईश्वर खुर्पे, राम गायकवाड, दत्ता महाजन, नी भोसले, अभय होके पाटील, सचिन डोंगरे, अमित नाटकर, मुज्जमिल पटेल, राहुल जगताप, अविनाश गोंडे, शहाजी सोळंके, सिद्धार्थ ससाणे, शेख रशीद, दत्ता कांबळे, फारुक सय्यद, अमोल शेरकर, विलास साळवे, शेख मैनिद्दिन, एकनाथ मस्के, लतिफ मोमीन यांच्यासह आंदोलनात सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठा समाजासह सर्व समाज घटकातील नागरिकांनी सहभागी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला सारून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे.