माजलगाव, दि.१४: माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आज (बुधवार) रात्री ७ वाजता भगवान गडाचे महंत यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील गोविंदवाडी येथे हनुमान मंदिर कलश स्थापना व अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरी भावकथा सोहळा दि.१२ फेब्रुवारी पासुन सुरू असुन आज बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे. या कीर्तन सोहळ्यास तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी गोविंदवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे