शिव जन्मोत्सव माजलगाव – २०२४
माजलगाव, दि.९: शिव जन्मोत्सव समिती माजलगाव आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज (शुक्रवारी) व्यापारी बांधवांच्या हस्ते नारळ वाढवुन करण्यात आला.
माजलगाव शिव जन्मोत्सव बाळु ताकट व त्यांचा मित्र परिवार सर्वधर्मीय विवाह सोहळा व
सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करतात. त्याच अनुषंगाने आज दि.९ शुक्रवारी ५.३० वाजता विवाह स्थळी मंडपाचे उभारणीचा नारळ वाढवून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, गोविंद बजाज, धनराज बंब, रामराजे रांजवण, नारायण सातपुते, संजय सोळंके, कैलास एलसेटे, गणेश लोहिया, सय्यद चुंनुभाई, एकनाथ मस्के, घनशाम भुतडा, बालाजी अंडील, कैलाश टाकणखार, अमोल शेरकर, पत्रकार वैजनाथ घायतिडक, शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी शिवप्रेमी उपस्थित होते.