हृदय विकाराच्या धोक्यापासून दूर रहायचेय
झटपट बातमी :-
बदलती जीवन शैली, बदलत्या खानपान सवयी मुळे जगभरात हृदयरोगाचे प्रमाण वाढले असून त्यावर शंका समाधान शोधण्यासाठी माजलगावमध्ये रोटरी क्लब सेंट्रल व यशवंत हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने “संवाद हृदया पासून हृदयापर्यंत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ४ वाजता केशवराज मंगल कार्यालय, केसापुरी कॅम्प जवळ होत असलेल्या हृदयरोगा वरील संवादरुपी जाहीर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंत हॉस्पिटलचे डॉ.यशवंत राजेभोसले व रोटरी क्लब सेंट्रल चे अध्यक्ष रो.इम्रान नाईक व सचिव रो.सुनील शिंदे यांनी केले आहे.
संवादरुपी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होत असून यात मराठवाड्यातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.मुकुंद बजाज, डॉ.अमित दुल्लरवार, डॉ.यशवंत राजेभोसले व डॉ.शिवरत्न शेटे हे सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील परखड पत्रकार संजय मालानी हे या सर्व तज्ञांची मुलाखत घेतील, यात उपस्थित श्रोत्यामधूनही हृदय रोगा संबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील.