दहावी,बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून १४४ कलम जारी

Spread the love

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचा निर्णय

झटपट बातमी :-

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा माहे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होत आहेत. या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ-मुंढे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात दि.२१ फेब्रुवारी २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत परिक्षेच्या वेळेच्या १ तास आगोदर ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरात व परिक्षेचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी मनाई आदेश जारी केले आहे.

परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा चालू असतांना परीक्ष न देणारे विद्यार्थी आणि इतर काही घटक परिक्षा केद्राच्या परिसरात परिक्षा चालू असतांना उपद्रव करित असतात. कॉपी देण्याचा प्रयत्न करतात तसेच परिसरातील झेराक्स सेंटरचा कॉपी पुरविण्यासाठी दूरूपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना व परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना बाहेरील व्यक्तींचा त्रास होऊ नये. याकरिता इयत्ता १२ वी. व १० वी.परिक्षा केंद्राच्या ठिकाणी व परिक्षा केंद्राच्या २०० मिटर परिसरात 144 कलम जारी केला आहे.  कर्तव्ये पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यवतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताची अंत्ययात्रासाठी लागु राहणार नाही.

Leave a Reply