शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून; हुकूमनाम्याआधारे ७/१२ पत्रकास नावे नोंदवा – भाई ॲड.गोले पाटील

Spread the love

झटपट बातमी :-

माजलगाव, दि.९: जिल्हाधिकारी बीड यांच्यासह तहसीलदार माजलगाव यांनी बार्शी बार असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात दिलेली माननीय उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेऊन. तडजोडीच्या हुकूमनाम्या आधारे ७/१२ पत्रकास शेतकऱ्यांच्या नावे फेरफार घेण्या बाबत तलाठी, मंडळ अधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांची तलाठी, मंडळ अधिकारी हे शंभर रुपयांच्या बॉण्डवर अडवून मनमानीपणे पैसे घेऊन फेरफार करतात. त्यावेळी स्टॅम्प ड्युटी लागत नाही, मात्र तडजोडीच्या हुकूमनाम्या आधारे फेर लावण्यासाठी स्टॅम्प ड्युटी सक्तीची असल्याचे सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. तरी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी याप्रकरणी लक्ष घालून माननीय उच्च न्यायालयाने बार्शी बार असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात दिलेले मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन. तडजोडीच्या हुकूम नाम्यावर स्टॅम्प ड्युटी न घेता ७/१२ पत्रकास शेतकऱ्यांचे नावे नोंदवण्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी यांना लेखी आदेशित करण्यात यावे, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील, यांच्यासह ॲड. प्रवीण अंबुरे, ॲड. सुधीर लिमगावकर, ॲड.हिंगण, ॲड.विलास देशमुख,ॲड.अजित जगताप, ॲड.अमोल डोंगरे आदी विधीज्ञासह त्रस्त शेतकर्यांनी दिला आहे.

Leave a Reply