मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावरील कारवाई वापस घ्या; मुस्लिम समाजाचा माजलगाव निषेध मोर्चा 

Spread the love

झटपट बातमी :-

मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावरील बेकायदा कारवाई करण्यात आली. याच्या निषेधार्थ माजलगाव तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वतीने आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता निषेध मोर्चा काढत; कारवाई माघे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 

       निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक मुफ्ती सलमान अजहरी यांनी कुण्या धर्म, कुण्या व्यक्तीचा नामोल्लेख केला नाही. मात्र केवळ मुस्लिम समाजाच्या द्वेष हेतूने त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम गुजरात एटीएस, महारष्ट्र एटीएस कडून करण्यात आले. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना चार दिवसापूर्वी गुजरात एटीएस कडून आक्षेपार्ह विधान केल्याचा ठपका ठेवत कारवाई करत अटक करण्यात आली होती.

यामुळे माजलगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर बेकायदेशीर रित्या करण्यात आलेली कारवाई वापस घेण्यात यावी. या मागणीसाठी आज दि.९ शुक्रवारी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply