माजलगाव शहर पोलीसांची कारवाई
झटपट बातमी :-
माजलगाव शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यात बसस्थानकात चोरट्यांचे जणू माहेर घरचं बनले असून पोलिसांना हे चोरटे गावात नव्हते. आज मात्र शहर पोलिसांनी गस्तीवर असताना दोन चोरट्यांना बसस्थानकात मोबाईल चोरून पळ काढताना नागरिक व पोलिसांनी पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.८ शुक्रवारी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस नाईक, गौतम गायकवाड, पोलीस शिपाई रामहारी उघडे हे माजलगाव बस स्थानक परीसरात गस्त करत होते. यावेळी माजलगाव बसस्थानकातून दोन चोरटे एका प्रवाशाचा मोबाईल फोन चोरी करुन त्यांच्या मोटार सायकलवरुन पळून जात होते, तितक्यात पोलीसांनी व नागरीकांनी सदर दोन चोरांना पकडले व प्रवाशाने सांगीतल्याप्रमाणे चोरटयांची झडती घेतली असता एका चोराकडे प्रवाशाचा चोरलेला मोबाईल फोन सापडला. शहर पोलीस ठाणे येथे सदरील चोरटे १) अक्षय धर्मेद्र मोरे (वय २३ वर्षे), २) शाम अशोक गोळेकर (वय २२ वर्षे) दोन्ही रा. पुरुषोत्तमपुरी ता. माजलगांव असे आहेत. वरील चोरटे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. चोरटयांकडून फिर्यादी नामे सय्यद समीर सय्यद इसाक रा. पात्रुड ता. माजलगाव यांचा चोरलेला रेड मी कंपनीचा मोबाईल फोन, किंमत १५,०००/- व चोरट्यांनी गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल जीची किंमत ७०,०००/- असा एकुण ८५,०००/- मुद्देमाल चोरटयांकडुन जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना उद्या रोजी मा. न्यायालयात रिमांड कामी हजर केले जाणार आहे. नमुद चोरटयांकडुन आनखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक बी.धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केतन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, पो.ना.गौतम गायकवाड, पो.शि.रामहारी उघडे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश तळेकर करीत आहेत.