कुणी पाणी देता का .. पाणी ; दिंद्रुड ग्रामस्थांचा ट्टाहो !

Spread the love

संतप्त होत अधिकारी – कर्मचाऱ्यांना पंचायत समितीत कोंडले

माजलगाव, दि.६: अनेक महिन्यापासून दिंद्रुड येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आज दिंद्रुडच्या रस्त्यावर आज (दि.६) रोजी दोन तास रास्ता रोको केला होता. परंतु या आंदोलनाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनीव न दिल्याने, संतप्त झालेल्या नागरिकांनी माजलगावच्या पंचायत समिती गाठत चक्का अधिकारी – कर्मचारी यानाच कार्यालयात कोंडले आहे.

दिंद्रुड येथे जनजीवन योजनेचे काम अनेक दिवसापासून रखडले आहे. त्यात पुन्हा पाण्याची समस्या दिवसेदिवस दिवस वाढत आहे. विहिरी आटत चालल्या आहेत. बोरला पाणी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याविना मोठे हाल होत आहेत. याबाबत नागरिकांनी अनेक प्रशासकीय ठिकाणी निवेदने दिली आहेत. मात्र या मागण्यांचा काहीच उपयोग होत नसल्याने आज (दि.६) मंगळवार रोजी येथील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास आंदोलन करूनही प्रशासकीय अधिकारी फिरकले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या दिंद्रुड येथील ग्रामस्थांनी थेट माजलगाव पंचायत समिती कार्यालय गाठत. पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य दार लावून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले आहे.

Leave a Reply