माजलगाव, दि.५(प्रतिनिधी) : माजलगाव शहरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता दोन आठवडे अवधी बाकी असून गरजवंत वधु – वरांच्या पालकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व दुग्धशर्करा योग म्हणून शिवराज्यभिषेकाचे ३५० वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा शिव जन्मोत्सव विविध सांस्कृतिक परंपरा जपणारे देखाव्याचे आकर्षण ठरणार आहे. त्यातच दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा शिवजन्मोत्सव दिनी दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्साहात होणार आहेत. यास दोन आठवडे बाकी असून गरजवंत वधु – वर यांच्या पालकांनी विवाह सोहळ्या साठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळु ताकट, प्रशांत होके, राहुल मुगदिया, बल्ली(विष्णु)होके, प्रसाद सावंत, सचिन सुरवसे, सुमित कुलकर्णी, वैभव मिठकरी, स्वप्नील भानप, पप्पु काळे, सुरज पवार, अजय रांजवण, युवराज नरवडे, प्रसाद काळे, राहुल सरोदे, अमर राजमाने, प्रदीप जाधव, मयूर वाघमारे, राजेश कोंबडे यांनी केले आहे.