माजलगाव, दि.४: माजलगाव ते गढी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकी वरील माय लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
आज दि.४ रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान माजलगाव – गढी रोडवर माऊली फाटा (हारकी लीमगाव) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पु सुभाष इंगळे (वय २२ वर्षे) व मालन सुभाष इंगळे (वय ४७ वर्षे) रा.राजेगाव हे माय लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.