विजेत्यांना मिळणार लाखो रुपयांची बक्षिसे
झटपट बातमी :-
माजलगाव – तालुक्यातील उमरी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजन केले आहे. बैलगाडा शर्यत, आरोग्य शिबिर , रक्तदान शिबीर,पालखी सोहळा यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत ठेवली असून या बैलगाडा शर्यतीत विजेत्यांना लाखो रुपयाची बक्षिसे मिळणार आहेत. या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा प्रेमींनी भाग घ्यावा, असे आवाहन काशी विश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट बीड व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उमरी यांनी केले आहे.
तालुक्यातील उमरी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो यावर्षी शिवजयंतीचे सहावे वर्षे असून यामध्ये बैलगाडा शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. बैलगाडा शर्यत ओपन मैदानावर दि.१४ फेब्रुवार रोजी खेळली जाणार आहे. यामध्ये बैलगाडा शर्यतीत प्रथम येणाऱ्या विजेत्यास आसाराम घायतिडक ३१,१३१ रु द्वितीय बक्षीस पत्रकार वैजनाथ घायतिडक २१,१२१, तिसरे बक्षीस बैलगाडा शर्यत आयोजक कमेटी १५,५१५,चौथे बक्षीस महादेव माने ११,१११ रू., पाचवे बक्षीस ज्ञानेश्वर घायतिडक ७,७७७ रू., सहावे बक्षिस मित्र प्रेम ग्रुप ५५५५ रू., सातवे बक्षीस मथुरदास घायतिडक ३,३३३ रूपये आसी बक्षिसे दिली जाणार आहेत. बैलगाडा शर्यती मध्ये भाग घेणाऱ्या साठी प्रवेश फीस पाचशे रुपये राहणार असुन स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाडा प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन बैलगाडा शर्यत कमिटी व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उमरी यांच्या वतीने केले आहे.
रुग्णांना आरोग्य शिबीर ठरणार उपयोगी
शिव जन्मोत्सवानिमित्त दि.१८ रोजी आरोग्य शिबीरात जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर सहभागी होणार आसुन रक्तदान शिबीर ही होणार आहे.दि.१९ रोजी ढोल ताशांच्या गजरा मध्ये भव्य पालखी सोहळा मिरवणूक होणार आहे. शिवजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास तालुक्यातील शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन काशी विश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट बीड व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उमरी यांनी केली आहे.