आडसमध्ये ११७ किलो गांजा पकडला: IPS कमलेश मीना यांच्या पथकाची कारवाई

Spread the love

झटपट बातमी :

गांजा घेऊन आडस मार्गे धारुरच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आडस शिवारातील निसर्ग धाब्याजवळ IPS कमलेश मीना यांच्या पथकाने पकडली. यामधे तब्बल ११७ किलो विनापरवाना गांजा मिळून आला असून या गुन्ह्यातील तीन महिला व दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. आरोपी धारुर, माजगाव व पाथरी (जि.परभणी) येथील आहेत.

एका स्कॉर्पिओ मध्ये आडस मार्गे गांजा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच आयपीएस (IPS) कमलेश मीना यांनी पथकासह अंबाजोगाई येथून पाठलाग सुरू केला. समोरुन धारुर पोलीसांनी येऊन आडस शिवारात निसर्ग धाब्याजवळ संशयित स्कॉर्पिओ थांबवून झडती घेतली. यात विनापरवाना ११७ किलो ७१० ग्राम गांजा मिळून आला. स्कॉर्पिओ मधील तीन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले. यावेळी गांजा किंमत ११ लाख ७७ हजार १०० रु., स्कॉर्पिओ (क्र. MH 23 Y 0714) , ५ लाख, दोन मोबाईल ५ हजार, रोख रक्कम ४२० असे एकूण १६ लाख ८२ हजार ५२० रू. मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विलास परसराम गायकवाड ( वय २३ वर्ष ) रा. मंगरुळ क्र.१ ता. माजलगाव, शिवाजी सिताराम फड ( वय ४२ वर्ष ) रा. चौंडी ता. धारुर, गंगाबाई पांढुरंग चव्हाण ( वय ५० वर्ष ) रा. सावरगाव ता. माजलगाव, शांताबाई दत्ता मोहिते ( वय ३८ वर्ष ) रा. पाथरगव्हाण ता. पाथरी ( जि. परभणी ), निर्मला दत्ता मोहिते ( वय २४ वर्ष ) रा. गांवदरा ता. धारुर यांच्यावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply