सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी भागवत शेजुळ तर उपाध्यक्षपदी नारायण भले यांची निवड

Spread the love

माजलगाव, दि.३१: माजलगाव तालुक्यातील सरपंच संघटनेची निवडणूक प्रक्रिया आज (गुरुवारी) पार पडली. यामध्ये सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सरपंच भागवत शेजुळ तर उपाध्यक्षपदी सुनील तोर, नारायण भले, कोषाध्यक्षपदी बिस्मिल्ला खा पठाण, सचिवपदी रुक्मानंद खेत्री यांच्या बिनविरोध निवड झाली.

सरपंच यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने माजलगाव तालुक्यातील सरपंच संघटना स्थानिक समिती गठित करण्यासाठी बैठकीचे आज (दि.३१) गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ऍड. नासेर खा पठाण, नारायण भले, भागवत शेजुळ हे इच्छुक म्हणून पुढे आले होते. सरपंच सदस्यांमध्ये चर्चा होऊन एकमताने भागवत शेजुळ यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. उपाध्यक्षपदी नारायण भले, सुनील तोर व कोषाध्यक्षपदी बिस्मिल्ला खा पठाण तर सचिवपदी रुक्मानंद खेत्री यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, नितीन नाईकनवरे, गीताराम अनभुले, कुंडलिकराव मायकर यांच्यासह सरपंच उपस्थित होते.

Leave a Reply