पुन्हा बिबट्याने धुनकवड शिवारात वासराचा फडशा पाडला

Spread the love

 १५ दिवस नव्हती हाल चाल

धारूर, दि.३१: तालुक्यातील धुनकवड शिवारात बिबट्याने वासराचा फडशा पडल्याची घटना आज (बुधवारी) समोर आली आहे. मागील महिन्यात दोन आठवडे बिबट्याने माजलगाव तालुक्यातील माजलगाव धरणाच्या क्षेत्रात हैदोस घातला होता. आत्ता अजून बिबट्याचा उच्छाद समोर आल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धारूर तालुक्यातील धुनकवड येथील शेतकरी विक्रम प्रल्हाद यादव यांच्या शेतात गायी, बैल, वासरे बाधलेले असतात. काल दि.३० रोजी रात्री बिबट्याने वासराचा फडशा पाडला आहे. या ठिकाणी वनपाल मोरे, वनविभागाचे कर्मचारी यांनी पंचनामा केला आहे.
बिबट्याने मागील महिन्यात माजलगाव धरण परिसरात असाच हैदोस घातला होता. शेतकऱ्यांचे अनेक पशुधन जीव घेतले होते. यानंतर मागील दि.१७ जानेवारी नंतर बिबट्याची हाल चाल आढलुन आली नाही. आत्ता पुन्हा धारूर तालुक्यातील धुनकवड शिवारात बिबट्याने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गासाह ग्रामस्थ भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply