वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने दोन तरुणांना चिरडले !

Spread the love

दोघांचा जागीच मृत्यू; ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल

माजलगाव, दि.३१: माजलगाव तालुक्यात वाळू तस्करांनी वाळु चोरीचा हैदोस घातला आहे. तालुक्यातील सादोळा गावानजीक गोदावरी नदीवरील सांगावी पुलानजिक वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची मंगळवारी संध्याकाळी ११.३० वाजता घटना घडली. या अपघातात मोटरसायकल वरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले आहेत.

अपघातात मयत झालेले विजय युवराज पगारे (वय ३७ वर्ष) व महेश रावसाहेब ढोकचाळे (वय ३३ वर्षे) दोन्ही राहणार रांजणखोल ता.राहाता जि. नगर येथील रहिवासी आहेत. दि.३० मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकी (क्र.होंडा एम एच-१७ सि.डब्ल्यू.३२०९)वरून माजलगाव तालुक्यातील सादोळा गावाजवळील सांगवी पुलावरून आष्टी शहराकडे जात होते. यावेळी सादोळा गंगा पात्रातून अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक देत चिरडले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
          दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, व्ही.बी. खराडे घटनास्थळी धाव घेत घटनास्थळा चा पंचनामा केला आहे. मृतांचे शव विच्छदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. अपघातातील ट्रॅक्टरसह दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहेत. आरोपी विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

Leave a Reply