बाप – लेका विरोधात माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल
माजलगाव, दि.३०: तालुक्यातील किट्टी आडगाव येथे विजतंत्र अधिकारी नवनाथ आगे हे लाईटचे दुरुस्तीचे काम करत होते. या ठिकाणी येऊन गावातीलच बाप-लेकानी येऊन विचारले कि तुम्ही लाईट का बंद केली. लाईटचे काम करू नकोस, असे म्हणत लोंखडी गजाने व लाथाबुक्क्यांनी महावितरणचे कर्मचारी आगे यास मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी माहिती अशी. की, किट्टी आडगाव येथील विजतंत्री अधिकारी नवनाथ भगवान आगे हे सोमवार (दि.२९) रोजी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी गावातील पुरूषोत्तम दत्तात्रय आगे व दत्तात्रय नारायण आगे या दोघांनी लाईट का बंद केली असा जाब महावितरण कर्मचारी नवनाथ आगे यास विचारत, लाईट चालू कर म्हणत विजतंत्र अधिकारी नवनाथ भगवान आगे यांना शिवीगाळ करत लोंखडी गजाने डोके फोडून जखमी केले. तर बाजुला उभा असलेले आशोक भगवान आगे यांना दत्तात्रय नारायण आगे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रोडवर ढकलून दिले.
पुरूषोत्तम दत्तात्रय आगे व दत्तात्रय नारायण आगे रा.किट्टी आडगाव यांच्या विरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा विज तंत्र अधिकारी नवनाथ आगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.