माजलगाव, दि.२८ (महेश होके) राज्याच्या ओबीसी नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली असता आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी थेट जरांगे पाटील यांना आपल्या ओबीसी समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे, असे प्रतिपादन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या कन्या अपूर्वा व तिर्थपुरी (जि.जालना) येथील प्रदिप सीताराम पवार यांचे चि.ऋषभ यांच्या विवाह आज दि.२८ रविवारी विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी ओबीसी नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे व मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील वधु – वराना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील ह्यांची माझी प्रत्यक्ष पहिल्यांदा भेट झाली आहे. त्यांचे मी ओबीसीत आल्याबद्दल स्वागत करते म्हणून मराठा समाजास एक प्रकारे ओबीसी समावेश बाबत हिरवा कंदील दाखवला आहे. विवाह प्रसंगी उपस्थित नागरिकांनी टाळ्याचा कडकडाट करून स्वागत केले. तर मनोज जरांगे पाटील यांनी गालातील गालात हसत प्रतिक्रिया दिली.