माजलगाव, दि.२१: आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते आज माजलगाव शहरात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते, सिंदफणा नदीवर पुलाच्या विकास कामाचे उद्घघाटने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास माजी आमदार आर.टी.देशमुख ह्यांनी उपस्थिती लावून अगोदरच सर्वांना धक्का दिला. तो कमी आहे की काय ? म्हणून भाषण ठोकत आ.सोळंके किती कामाचे हेच बार उडवत राहिले.
माजलगाव शहरात ३.५ कोटी रुपयांची रस्त्यांच्या व दक्षिण मुखी मारोती मंदिर देवस्थान येथून माजलगाव शहरास जोडणाऱ्या सिंदफणा नदीवरील ८ कोटी रुपयांच्या पुलाचे कामाचे आज (दि.२१) रविवारी उद्घघाटन आ.प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे हे होते तर माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी मागील चार पाच वर्षात आमदार आर टी.देशमुख यांचे भाषण एकवयास मिळाले नव्हते. योगा योगाने राज्यात नवी युती झाली. देशमुख – आ.सोळंके हे एका व्यासपीठावर येऊन काय बोलणार याची उत्सुकता अनेकांना होती. तर आर. टी. नी पाच मिनिटाच्या भाषणात दादा किती कामाचे, मी त्यांनाच आदर्श मानून चालतो. दादा कसा विकास करतात, दादा शिवाय विकास होऊ शकत नाही, असे एका मागो माग नुसत्या आ.सोळंकेच्या स्तुतीचे बार उडवू लागले. या त्यांच्या भाषणाची एकच चर्चा आहे.