माजलगाव, दि.२०: मराठा आरक्षणाच्या आर या पार स्थितीत असलेल्या लढ्याच्या अनुषंगाने गावागावांतील लाखो मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.
त्याचसाठी तालुक्यातील साळेगाव, कोथरुळ ह्या गावाचे मराठा समाज बांधव ही मोठ्या संख्येने आज दि.२० शनिवारी मनोज जरांगे पाटील ह्यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पायी दौऱ्यासाठी कूच करण्यासाठी निघाले. मुंबईकडे निघणाऱ्या वाहनांचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते नारळ वाढवून वाहने रवाना केली.
यावेळी बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग सोळंके, जयदत्त नरवडे, सतिष कदम, बलराज कदम व साळेगाव, कोथरूळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.