MPSC परिक्षेत माजलगावचा क्षितिज मोगरेकर चमकला !

Spread the love

माजलगाव, दि.१८: एमपीएससी (MPSC) कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा अंतिम गुणवत्ता यादी जाहीर आली आहे. यामधे माजलगावचा क्षितिज उमेशराव मोगरेकर उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमपीएससी (MPSC) च्या ६१३ जगासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार मुलाखतीसाठी निवडण्यात आले होते. या उमेदवाराच्या मुलाखतीचा अंतिम टप्पा नुकताच पार पडला आणि राज्य सेवा परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामधे माजलगाव येथील माजलगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उमेशराव मोगरेकर ह्यांचे द्वितीय चि.क्षितिज मोगरेकर ह्याने यश मिळवत गुणवत्ता यादीत १८८ क्रमांक पटकावला आहे.
     क्षितिज मोगरेकर यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply