शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे थकीत १४९ रुपये द्या; अन्यथा आंदोलन !

Spread the love

लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याकडे किसान सभेची मागणी

माजलगाव, दि.१७: लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये जाहीर केलेले. परंतु दुसरा हंगाम अर्धा झालेला असताना ही, थकीत ठेवलेले १४९ रुपये शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्यात यावेत, अशी मागणी किसान सभेच्या वतीने कारखाना व्यवस्थापकिय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कारखाना प्रशासनास दिला आहे.

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आ.प्रकाश सोळंके ह्यांनी गळीत हंगाम २०२२-२०२३ साठी २७०० रुपये प्रतिटन भाव जाहीर केला होता. त्यांपैकी केवळ २५५१ रुपये प्रमाणे बिल अदा केले, मात्र १४९ रुपये थकीत आहेत. सध्याची दुष्काळ सदृष्य परिस्थिती पाहता व त्यात दुसरा गळीत हंगाम संपत आला तरी अद्याप मागील हंगामाचे बिल थकवले आहेत. परिणामी ते मिळणार की नाही ? याबद्दल साशंकता निर्माण झाली. ती आपण १४९ रुपये अदा करत दूर करावी. तत्कालीन चेअरमन तथा आ.प्रकाश सोळंके शेतकऱ्याना सर्वांसमोर दिलेला शब्द खरा ठरवावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य किसान सभाच्या वतीने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा कॉ दत्ता डाके, कॉ.मुसद्दिक बाबा यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे कारखान्याचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक यांना आज (दि.१७) बुधवारी दिला आहे. यावेळी कॉ.मोहन जाधव, जगदीश फरताडे, कृष्णा सोळंके, राजाभाऊ बादडे, गितेश आगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply