माजलगाव, दि.१७: माजलगाव- पाथरी रोडवर बस व दुचाकी अपघात झाला. यामधे दुचाकीवरील सतिष बोटे (वय ४५ वर्षे) याचा अपघात मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (आज) दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष बोटे हे दुचाकीवरून माजलगावकडे येत होते तर बस माजलगावकडून पाथरीकडे जात होती. या दरम्यान बुधवारी ४ वाजण्याच्या दरम्यान शिवनेरी हॉटेल जवळ अपघात झाला. यामधे सतिष बोटे हे गंभीर जखमी झाले असता नागरिकांनी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्यांना वैद्यकिय अधिकारी यांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. सतिष बोटे हे मितभाषी व्यक्तिमत्व व एक कट्टर शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख सर्वपरिचित होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.