बिबट्याने पुन्हा सावरगाव शिवारात वगारीचा फडशा पाडला

Spread the love

७२ तासाला शिकारीच्या घटना !

माजलगाव, दि.१७: माजलगाव धरण लगतच्या गावात बिबट्याचा उच्छाद सुरूच आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माघे सावरगाव शिवारात जगताप यांच्या शेतातील एक वगारीचा फडशा पडल्याची घटना समोर आली आहे.

 

माजलगाव धरणाच्या लगत जलाशय परिसरात ऊस पीक अधिक असल्याने लपनचा अधिक फायदा घेत बिबट्या वन विभागाला दोन पिंजरे लाऊन ही गुंगारा देत आहे. परिणामी मागील आठवडाभरापासून पशुधनाची जीव घेण्याचा घटना थांबेना गेल्या आहेत. तीन दिवसापूर्वी पासून सावरगाव व मंगरूळ शिवारात पिंजरे लावलेले असताना अद्याप बिबट्या गावला नाही. त्यातच आज (दि.१७) बुधवारी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मागे सावरगाव शिवारातील सुधाकरराव जगताप यांच्या शेतातील गोठ्यातील वगार फडफडत नेऊन फडशा पाडल्याचे सकाळी समोर आले आहे. दर ७२ तासाने बिबट्या पशुवर हल्ला चढवत असल्याचे समोर येत आहे. सदरील पशुची पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीमती लाड, डॉ.राठोड यांनी पंचनामा करून शव विच्छेदन केले आहे.

वन विभागणे विशेष मोहीम राबवावी – डॉ.नाईकनवरे

मागील आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभगाने विशेष मोहीम राबवून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी केली आहे.

Leave a Reply