तुमच्या ‘ गावाने ‘ मला भरभरुन दिले – आ.सोळंके

Spread the love

माजलगाव, दि.१६: मतदार संघातील लोकसंख्येने सर्वात मोठे असलेले पात्रुड ग्रामस्थ कायम माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिलेले आहेत. मला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद देत आलेले असल्याने पात्रुडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध असल्याचा आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.

पात्रुड येथील उर्दू दारूलूम मदरसा या ठिकाणी आमदार फंडातून वीस लक्ष रुपये रस्ता कामासाठी, मारुती मंदिर या ठिकाणी दहा लक्ष रुपये तर ग्रामपंचायतीचा 50 लाख रुपयांचा निधी कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ.सोळंके सोमवार दि.१५ रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव पोटभरे होते तर जयसिंग सोळंके, जयदत्त नरवाडे, श्रीहरी मोरे, चंद्रकांत शेजूळ, एकनाथ मस्के हे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, येणारा काळा हा महायुतीच्या नेतृत्वाखाली होणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे ही सुतोवाच त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच लतिफ, उपसरपंच घनश्याम भुतडा, नजीर कुरेशी, अ.जब्बार अ.रज्जाक, इफ्तार पटेल, बाळू बनकर, अशोक अगरकर, भानुदास भुजबळ, मुजाहेद पटेल, शेख बाबूभाई, अरुण जंगले, अहमद शाह यांनी केले होते. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply