अंतरवली सरटी, दि.१५: मराठा आरक्षणाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज मुंबई जाण्याचा मार्ग जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठे आंदोलन करणार असून या आंदोलनकरिता अंतरवली सराटी ते मुंबई प्रवासादरम्यान कुठे कुठे मुक्काम असणार आहेत. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच मुंबईत किती लोक येणार ? याची माहिती देत दि.२० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवली सराटी निघणार आहोत.
असा राहील मार्ग …
- 20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात.
- 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)
- 22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
- 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे
- 24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
- 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, नवी मुंबई
- 26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी