डझनभर अपघाती बळी, शेकडो जणांना अपंगत्व आल्यावर आली आमदारांना जाग!

Spread the love

माजलगाव – तेलगाव रस्त्यासाठी आज करणार रस्ता रोको

माजलगाव, दि.१४: आमदार प्रकाश सोळंके ह्यांचा सर्वाधिक रहदारीचा मार्ग म्हणजे माजलगाव ते तेलगाव रस्ता आहे. या रस्त्यावर मागील दोन वर्षापासून त्यातली त्यात … या सहा महिन्यात अक्षरशः भेगा नव्हे तर भगळी पडल्या आहेत. परिणामी दोन ते तीन महिन्यात डझनभर निष्पाप लोकांचे अपघाती बळी गेले आहेत, तसेच एक नव्हे – दोन नव्हे तर शेकडो लोकांना अपंगत्व आले आहे. या जीवघेण्या प्रश्नाबाबत प्रकाश सोळंके ह्यांना अखेर जाग आली असून आज (दि.१५) परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर केले आहे.

माजलगाव ते तेलगाव रस्ता हा सर्वाधिक दळण वळण असलेला मतदार संघातील महत्वाचा मार्ग. या रस्त्याची वर्षानुवर्षे दैना राहिलेली असून खडतर प्रवास लोकांच्या नशिबी आलेला आहे. तो कसा बसा आत्ता कायमचा मिटणार ही आशा खामगाव ते पंढरपूर हा पालखी महामार्ग याच मार्गावरून गेल्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. पहिले लोक खड्यानी त्रस्त होते, म्हणून खामगाव पंढरपूर मार्ग झाल्यावर तर या रस्त्यावर अक्षरशः भेगा म्हणावा? की भगळी ? अशीच अवस्था रस्त्याची झाली. परिणामी या रस्त्यावर मागील दोन – तीन महिन्यात सातत्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली असून यात डझनभर निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तर शेकडो लोकांना अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. अनेक जण अक्षरशः आज ही मृत्यूशी झुंज देत आहेत.

आपल्या जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे ह्यांना ही या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होत असलेल्या अपघाताच्या बातम्या म्हणा किंवा प्रवासात भगळी पडलेला रस्ता दिसत नसेल का ? असा प्रश्न पडतो. असो त्यांना जरा जिल्ह्याचा मोठा व्याप असेल किंवा त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येते. असो त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे माजलगाव मतदार संघातून आमदार होण्याचे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले रमेश आडसकर, मोहन जगताप ह्यांना या समस्ये बाबत किती उदासीनता आहे हे दिसून येते. मागिल दोन दिवसापूर्वी मोहन जगताप हे देव जाणे कुठे केंद्रित मंत्री नितीन गडकरी ह्यांना भेटले अन् काय चर्चा केली त्यांनाच ठाऊक. पण त्यांनी माजलगाव तेलगाव रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आपण गाऱ्हाणे मांडले असल्याच्या बातम्या पेरल्या.

यात मग आपले आमदार महोदय हे कसे मागे राहतील. दररोज भगळी पडलेल्या या रस्त्यावरून मोठ्या टायरच्या गाडीतून प्रवास करताना त्यांना जाणवले नसेल. परंतू अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे व त्यातून जनतेतून रोष व्यक्त होऊ लागला. या बाबी त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे किंवा जनते प्रती नाते वृद्धिंगत झाल्याने जाग आली. अन् त्यांनी समाज माध्यमाद्वारे तेलगाव – माजलगाव रस्त्याच्या प्रश्नावर आज सोमवार दि.१५ रोजी सकाळी १० वाजता, परभणी फाटा रस्ता रोको आंदोलन पुकारले आहे. त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

Leave a Reply