माजलगाव, दि.१४: माजलगाव धरणालगत १५ कि.मी. परीसरात बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याना पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे बसविले असून परीसरातील शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या पशुधनांना सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच स्वतः ही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेञ अधिकारी उत्तम चिकटे यांनी केले आहे.
माजलगाव धरणच्या पाणी असलेल्या गावालगतच्या क्षेत्रात शेतकरी सध्या बिबट्याच्या दहशतीत आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून अनेक पशुधनाची फडशा पाडला आहे. तर मागील दोन दिवसापूर्वी प्रसंग बिबट्याच्या हल्ल्यातून मनुष्यहानी होण्यापासून सुदैवाने टळली आहे. तसेच आज (दि १४) रविवारी सावरगाव शिवारात धारण परिसरलगत माऊली सुरवसे या शेतकऱ्याची गायीची शिकार केल्याचे समोर आले आहे. यावर ह्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने काल (दि.१३) रोजी मंगरुळ व आज (दि.१४) रविवारी सावरगाव परिसरात बिबट्यास पिंजरे बसविले आहेत. मंगरुळ येथे बसविलेल्या पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकला नसून वनविभागाने परत दुसरा सावरगाव परिसरात दुसरा पिंजरा बसविला आहे. परिसरातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन चिकटे यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपले पशुधन उघड्यावर n बांधता सुरक्षित स्थळी बांधावे, म्हणजे बिबट्या सावजाच्या शोधात पिंजऱ्याकडे येईल व तो कैद होईल. सध्या हल्ले झालेल्या गावाच्या परिसरातील नागरीक आपले पशु उघड्यावर बांधत असल्याने बिबट्याला सहज शिकार मिळत असल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याने नागरीकांनी सुरक्षेबाबत सतर्कता बाळगावी. तसेच परिसरातील नागरीकांनी मिरची, बोंदरी, आॕईलची चिलीम आपल्या गोठ्याच्या परिसरात जाळावी म्हणजे बिबट्या परिसरात फिरकणार नाही. वनविभागाच्या दोन टिम परिसरात राञनदिवस गस्त घालीत असून नागरीकांनीही अफवांनवर विश्वास न ठेवता कुठलेही फेक व्हिडीओ व्हायरल करु नयेत, जेने करुन नागरीकांत भिती निर्मान होणार नाही. परिसरात भोंगे, फटाके वाजवावेत असे आवाहन ही वनपरिक्षेञ अधिकारी उत्तम चिकटे,परीमंडळ अधिकारी दिनेश मोरे यांनी केले असून परिसरात वनरक्षक ए.जे.केदार, मसवले, निसर्गंध, गाडे, गुंदेकर, अंडील, सिदेश्वर चव्हान, शाम चव्हान हे कर्मचारी गस्तीवर आहेत.