प्रकाश सोळंके प्रथमच करणार स्वतःचा वाढदिवस कार्यकर्त्यांसमवेत साजरा !

Spread the love

माजलगाव, दि.१३: माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके त्यांचा स्वतः चा वाढदिवस प्रथमच माजलगाव येथे कार्यकर्त्यांसमवेत साजरा करणार असल्याचे त्यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर केले आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाचे माजलगाव शहरासह मतदार संघात एकच चर्चा आहे, ती म्हणजे प्रकाश सोळंके पहिल्यांदाच वाढदिवस कुटुंबासह न साजरा करता आपल्या सोबत साजरा करणार… यावर उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

आमदार प्रकाश सोळंके यांचे करिअर माजलगाव मधल्या जनतेच्या आशिर्वादावर असल्याचे हे सर्वश्रुत आहे. मात्र त्यांनी दीपावली असेल किंवा त्यांचा स्वतः चा वाढदिवस असेल अपवादात्मक सोडता कधीच मतदार संघातील लोकासोबत, कार्यकर्त्यां समवेत साजरा केलेला नाही. तर स्वतः च्या कुटुंबासह साजरा करण्यात आल्याचे एकावयास आलेले आहे. मात्र यावर्षीचा वाढदिवस याला अपवाद ठरत आहे. प्रकाश सोळंके ह्यांनी आज शनिवारी (दि.१३) रोजी समाज माध्यमाद्वारे उद्या दिनांक १४ जानेवारी रोजी आपल्या प्रेमाच्या आग्रहाखातर मी सकाळी ९.३० ते ११.३० वा. निवासस्थानीच (माजलगाव येथील) आपल्या सदिच्छा भेटीसाठी थांबणार आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता व मराठा आरक्षणाचा प्रलंबीत प्रश्न यामुळे यामुळे कृपया भेटावयास येताना पुष्पहार आणि इतर सत्काराचे साहित्य आणू नये ही विनंती करत आपल्या शुभेच्छा व आपली सदिच्छा भेट यानेच आपल्यातील नाते वृद्धिंगत होईल. असे जाहीर केले आहे.
मात्र आमदार प्रकाश सोळंके ह्याच्या वाढदिवस प्रथमच कार्यकर्त्यांसमवेत साजरा करण्याचा निर्णयाने काही कार्यकर्त्यांना सुखद धक्का तर काही कार्यकर्त्यांना पचनी पडले नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया तर तुम्हा सर्वांना एकावयासच मिळत आहेत, असो निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पुढाऱ्यांचे जनतेप्रती व कार्यकर्त्या प्रती नाते वृद्धिंगत होणारच ना ! त्याला प्रकाश सोळंके कसे अपवाद ठरणार. त्यांचे वय व वाढदिवस जरी ६९ वा असला तरी ते मागील ४० वर्षापासून राजकीय आखाड्यातील तेल लावलेले मुर्रब्बी पहिलवान आहेत. आगामी २०२४ च्या कुस्तीत उतरून समोरच्याला चितपट करण्यासाठी चंग चंग चालू आहे.

Advt

Leave a Reply