आठ दिवसांपासून बिबट्याने घातला आहे धुमाकूळ !
माजलगाव, दि.११: तालुक्यात मागील आठवडाभरापासून बिबट्याने अनेक गावात धुमाकूळ घातला आहे. अनेक पशुचा फडशा पाडला होता, त्यातच दोन दिवसापूर्वी मनुष्यहानी होता होता सुदैवाने टळली. यावर आत्ता वन विभागाने शनिवारी (आज) दुपारी २ वाजता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
माजलगाव तालुक्यातील मंगरूळ, राम पिंपळगाव, एकदरा, माळेवाडी (सुलतानपूर) ह्या गावात बिबट्याने धुमाकूळ घालत बकऱ्या, गाईसह पशुधनाच्या फडशा पाडला. त्यातच दोन दिवसापूर्वी फुले पिंपळगाव शिवारात असलेल्या उंबरे वस्तीवर बिबट्याने महिलेवर हल्ला चढवत झडप मारणारच, तितक्यात तिथे असलेल्या पाळीव कुत्र्याने बिबट्याच्या दिशेने हल्ला प्रतिकार केला. देव बलवत्तर म्हणून उंबरे कुटुंबातील ती महिला बछावली. या बिबट्याच्या सततच्या हल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच शेतात ही जाण्यास कुणी धजावत नाही. यावर ग्रामस्थांनी पिंजरा लाऊन तात्काळ बिबट्या पकडुन बंदोबस्त करावा अशी मागणी, वन विभागाकडे होत होती.
अखेर आज दि.१३ शनिवारी दुपारी १ वाजता वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मंगरूळ नं. १ शिवारात पिंजरा लावण्यात आला आहे. यावेळी वन परिमंडळ अधिकारी मोरे, वन रक्षक केदार यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Advt