मुंबई, दि.१२: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी मराठे २० जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत. परंतु या त्यांच्या आदोळणास परवानगी देऊ नये म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने कायदा सुव्यवस्था राखण ही जवाबदारी प्रशासनाची आहे, यात हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत याचिका फेटाळली.

मराठा आरक्षणा मागणी मनोज जरांगे पाटील ह्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यानुसार आत्ता सरसगट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे या मागणी करिता मुंबई येथे २० जानेवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्यभरातील मराठा समाजाने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन केले होते. या आंदोलनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ह्याची आज सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील ह्यांच्या विरोधातील जनहित याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला.
Advt

