माजलगाव, दि.५: तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ३१ ग्रामपंचायत करिता आज क्षुल्लक वाद सोडता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ८२.७७ टक्के मतदान झाले.
माजलगाव तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम दुसऱ्या टप्यात होता. मात्र यात मराठा आरक्षणाच्या मागणी करिता उमरी बु., हरकी निमगाव, राजेगाव, टालेवाडी, सावरगाव, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, बेलुरा, डाके पिंप्री या ९ ग्रामपंचायतनी बहिष्कार टाकला होता. तर सरवर पिंपळगाव व लुखेगाव या ग्रामपंचायत बिनविरोध पार पडल्या. तर उर्वरित केसापुरी, लऊळ, पात्रुड, सोमठाणा, भाटवडगाव, निपाणी टाकळी, छोटेवाडी, मंगरूळ, सांडस चिंचोली, खतगव्हाण, बाराभाई तांडा, डूब्बामजरा, मंजरथ, साळेगाव, लोणगाव, खानापूर, शिंदेवाडी वा., रिधोरी, काळेगावथडी, शिंदेवाडी पा., सिमरी पारगाव, घळाटवाडी, फुलेपिंपळगाव, तालखेड, चिंचगव्हाण, शेलापुरी, टाकरवण, वारोळा, कोथरूड, वांगी बु., तेलगाव खु. या ग्रामपंचायत निवडणुकी करिता आज रविवारी सकाळी ७.३० वा. पासून सायं.५.३० पर्यंत मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला. एकूण ६५ हजार २७३ मतदार पैकी ५४ हजार २४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सरासरी ८२.७७ टक्के मतदान झाले.