रोषणपूरी येथील संत बुवाजी बुवा देवस्थानच्या दानपेटीची चोरी !

Spread the love

भाविकातून होतोय संताप व्यक्त; पोलीसानी तात्काळ चोरट्यांचा शोध लावण्याची मागणी

माजलगाव, दि.३०: तालुक्यातील रोषनपुरी येथील जागृत देवस्थान असलेल्या संत बुवाजी बुवा देवस्थान येथील दानपेटीची अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची रात्रीतून घडली आहे. यामुळे मात्र भाविकातून संताप व्यक्त होत असून चोरट्यांचा पोलीसांनी तात्काळ तपास लावावा अशी मागणी होत आहे.

 

माजलगाव तालुक्यात रोषणपुरी येथील संत बुवाजी बुवा देवस्थान प्रसिद्ध आहे. मंदिर मोठ्या प्रमाणात जिल्हाभरासह बाहेर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दैनदीन दिनक्रमानुसार संस्थांचे महाराज रात्री झोपले होते. या दरम्यान आज (दि.३०) बुधवारी सकाळी पूजेसाठी मंदिराच्या जवळ गेले असता दानपेटी गायब असल्याचे निदर्शनास आले. यावर गावातील भाविकांना बोलाऊन महाराजांनी आजु बाजूला शोधा शोध घेतला. मात्र त्या ठिकाणी दान पेटी आढलून आली. याची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसात दिली असता पोलीस कॉन्स्टेबल झाटे ह्यांनी भेट दिली आहे.
संत बुवाजी बुवा मंदिरातील चोरीस गेलेल्या दानपेटीसह चोरट्यांचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी भाविकांतून होत आहे.

Leave a Reply