माजलगाव, दि.२९: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी तन्मय होके पाटील यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही निवड विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधीर गव्हाणे यांनी जाहीर करत आ.रोहित पवार यांनी निवडीचे नियुक्तीपत्र दिले.
तन्मय होके पाटील हे मुंबई येथे मिठीबाई लॉ कॉलेज येथे ४ थ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. होके पाटील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर होते. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन आज (दि.२९) मंगळवारी मुंबई येथे पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खा.सुप्रिया सुळे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, आ.संदीप क्षीरसागर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर, गव्हाणे, बबन गित्ते आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन तन्मय होके पाटील यांना शरद पवार साहेब यांच्या विचारांनुसार विद्यार्थांच्या प्रश्नावर आवाज उठवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भरीव कार्य कराल व संघटन मजबूत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.